मंगळवार, २१ ऑक्टोबर, २००८

सुस्वागतम्

नमस्कार हेलो हाय... माझ्या ब्लॉगवर आपल हार्दिक स्वागत. ब्लॉगला मराठीत काय म्हणतात बरं ? कुणास ठावुक. गुगलकाकांना विचारू म्हणताय? काही म्हणेनात का, बघु नंतर. तुम्हाला माहित आहे म्हणता ? मग सांगा बरं.
मी कोण? अरे... माझी ओळख करुन द्यायची राहिलीच की. मी एक संगणकतज्ञ. उसगावात (नवीजर्सी-बागराज्यात) राहतो. मुळचा कोकणातला. कणकवलीचो वो. माध्यमिक शाळा महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. आईवडिल आणि जवळजवळ ८०% नातेवाईक मुंबईत आहेत म्हणून मुंबईचा. सिंगापुरला ५ वर्ष होतो म्हणून सिंगापुरी. सध्या उसगावावकर.
तुमच्याशी संवाद साधावा हीच ईच्छा. जमेल तसं इथे काहीबाही लिहिण्याचा प्रयत्न करायच ठरवलय.

तर लवकरच पुन्हा भेटु. ऐसपैस गप्पा मारु. थोड्या इकडच्या थोड्या तिकडच्या. तो पर्यंत माझ्या शुद्धलेखनाच्या चुका काढा. :-)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: